नात्यांचे महत्व
आजची नाती- Today's Relationship 👩❤️👨
नाती म्हणजे व्यक्तींमधील सबंध. आता नाती म्हंटली तर अनेक नाते सबंध येतात आणि एका माणसाचे आयुष्य हे असंख्य नात्यांनी जोडले गेलेले असते, अगदी माणसाच्या जन्मापासून तर मरणापर्यंत नात्यामध्ये अडकत जात असतो आणि त्यातून बाहेर पडणे हे अशक्य असते हे तुम्हाला आम्हाला चांगलच माहिती आहे. समाजात आणि आपल्या वैयक्तिक आयुष्यात नाती वेगवेगळी असतात जसे की:
१. कुटुंबातील नाती-🧑🤝🧑👭 आई वडील, भाऊ बहिण, पती पत्नी, मुलं पालक, आजी आजोबा, आणि इतर कुटुंबातील नाती.
२. मैत्रीची नाती- 👫दोन व्यक्तींमध्ये आपुलकी, विश्वास, आणि साहचर्य यामुळे तयार झालेलं नातं म्हणजेच मैत्रीचं नातं.
३. मनाचे / प्रेमाची नाती-👩❤️👨 दोन व्यक्तींचे एकमेकांवर प्रेम असतं जे नाते मनाने जोडले जातात ती नाती म्हणजे प्रेमाची / मनाची नाती होय.
४. व्यावसायिक नाती- 🧑💻🧑💼नोकरीच्या किंवा कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांशी, वरिष्ठांशी किंवा भागीदांराशी जोडली गेलेली असतात ती व्यावसायिक नाती होय.
५. सामाजिक नाती-🧑🏫🧕 सहकारी, शेजारी किंवा समाजातील इतर लोकांशी असलेले संबंध.
६. माणुसकीची नाती- 🧑💼🤵👰'माणुसकीचे नाते' हे इतर सगळ्याच नात्यांच्या पलीकडे असते कारण कोणत्याही अपेक्षेशिवाय निभावले जाते ते नाते म्हणजे माणुसकीचे.
वरील सर्व नाती म्हणजे एकमेकांशी जोडलेले संबंध होय. ज्यामुळे समाजात किंवा कुटुंबात संवाद, प्रेम, विश्वास, जबाबदारी आणि आपुलकी निर्माण होते.
विश्वास - Trust ❤️🩹
नात्यांमधील विश्वास हाच नात्यांच्या खरा पाया असतो. कोणतही नातं टिकवण्यासाठी आणि त्याला अधिक मजबूत करण्यासाठी विश्वास हा अत्यावश्यक घटक असतो. विश्वास म्हणजे दोन व्यक्तींमधली परस्पर विश्वासाहर्ता, समजूतदारपणा, आणि एकमेकांवर असलेली जबाबदारी होय. नाती दीर्घकाळ टिकुन राहण्यासाठी विश्वास टिकून राहणे महत्त्वाचे असते व विश्वास टिकून राहण्यासाठी एका नात्यामध्ये प्रामाणिकपणा, पारदर्शकता आणि सत्यता आवश्यक असते.
नियमित संवाद हा ही महत्वाचा भाग असतो एखादे नाते टिकवण्यासाठी , एकमेकांशी खुलेपणाने आणि प्रामाणिकपणाने संवाद साधल्याने गैरसमज दूर होतात आणि विश्वास वाढतो व नाते घट्ट होते.
विश्वास हा असा शब्द आहे ज्यावर नात्यांच 'भविष्य' टिकून असते. ज्या नात्यामध्ये विश्वास असतो ती आयुष्य भराची असतात व विश्र्वास नसलेल्या नात्यामधे असुरक्षितता, शंका, तणाव वाढण्याची शक्यता जास्त असते म्हणूनच म्हंटले जाते की विश्र्वास आहे तर नातं आहे आणि जिथं विश्र्वास नाही तिथं नातं नाही. एक वेळ नात्यांमध्ये प्रेम नसेल तरी चालेल पण विश्वास मात्र असलाच पाहिजे. कोणत्याही नात्यांमधला विश्र्वास हा काचे सारखा असतो एकदा तडा गेला किंवा तुटला तर परत जोडणे अशक्य असते.
प्रेम- Love 💕🥰
प्रेम ही एकमेकांवर केली जाणारी सुंदर अशी भावना आहे. अस म्हणतात की प्रेमापेक्षा सुंदर गोष्ट या जगात दूसरी कोणतीच नाही याचा साक्षात्कार प्रत्येकाला आपल्या आयुष्यात कधी ना कधी होतच असतो कारण प्रेम ही अशी गोष्ट आहे ज्याने राक्षसाचा माणूस होतो याचे ही उदाहरणे आपण सगळ्यांनी कुठे ना कुठे पहिलेच असणार. प्रेम असतं तिथं विश्वास असतोच परंतु प्रत्येक नात्यात प्रेम असेलच असे ही नाही काही नाती विश्वासावर टिकून असतात त्यात प्रेमाची अपेक्षा नसते ते नातं निःस्वार्थ असत. आजकालची नाती ही स्वार्थापोटी जोडली जातात व स्वार्थ पूर्ण झाला की सहज तोडून दिली जातात, अशी मानसिकता घेऊन माणूस जगू तर शकतो परंतु तो स्वतःचा आनंद हिरावून बसतो हे सत्य आहे. जिथं स्वार्थ असतो तिथं प्रेम कधीच नसते ती फक्त तात्पुरती गरज असते जी पूर्ण केली जाते आणि हा माणसाचा स्वभाव आहे जो बदलत राहतो.
स्वातंत्र्य - Freedom 💃🕺
स्वातंत्र्य म्हणजेच मोकळीक जी प्रत्येक नात्याची गरज आहे. नात्यांमध्ये स्वातंत्र्य असणे जास्त महत्वाचे आहे कारण जबरदस्तीने कोणालाही आपलं करता येत नाही, तेव्हढेच त्याला मोकळेपणा दिला तर तिथं एक घट्ट नातं तयार होते, फक्त मोकळेपणा च नव्हे तर पुरेसा वेळ आणि समजून घेतलं की सगळ आपोआप जुळून येतं. एखाद्याला आपलं बनवायचं असेल तर त्याला वेळ, स्वातंत्र्य देणे गरजेचे असते त्याच्या मनात जागा आपोआप निर्माण होते. प्रत्येकाच्या आयुष्यावर त्याचा पूर्ण हक्क असतो, त्याने कस वागावं, राहावं याचे स्वातंत्र्य त्याला असते परंतु तेच जर एखाद्या व्यक्तीने नियंत्रित करायचा प्रयत्न केला तर ते नातं टिकणे अशक्य होत जाते.
अपेक्षा - Expectations 🥹
आता अपेक्षा म्हंटल्या तर कोणाला नसतात, प्रत्येक नात्यांमध्ये अपेक्षा असतातच, मुलाच्या आपल्या आई वडिलांकडून, पत्नीच्या आपल्या पतीकडून तर प्रेमात असलेल्या एका प्रेयसीच्या आपल्या प्रियकराकडून अश्या असंख्य अपेक्षा असतात व अपेक्षा संपता संपत नाहीत हे वास्तव आहे.एकमेकांकडून अपेक्षा ठेवणे सहाजिकच आहे खर तर तो माणसाचा स्वभावच आहे परंतु, ह्या ' अपेक्षा ' एका मर्यादेपुरत्या असल्या तर तरच नाती टिकून असतात, कारण अपेक्षांचं ओझं वाढलं की नाती हळूहळू तुटायला सुरवात होते , रोजच्या वाढणाऱ्या अपेक्षा व त्या पूर्ण न होण्याचं कारण नात्यांमध्ये दुरावा निर्माण करतात म्हणून इथे तडजोड करणे ही गरजेचं असते.
तात्पर्य असे की , एका माणसाच्या आयुष्यात नात्यांना महत्त्व देणे फार गरजेचे आहे , आजच्या काळात तरी नात्यांना फारसे महत्त्व उरले नाही आजची पिढी एकटेपणा कडे जास्त वळतांना दिसतेय आणि हाच एकटेपणा त्या व्यक्तीला निराशेकडे नेण्यास कारणीभूत ठरतो व याने आयुष्याची राखरांगोळी व्हायला उशीर लागत नाही, म्हणून नाती जपली पाहिजे.
THANK YOU ❤️
Comments
Post a Comment